बंद दरम्यान दाखल झालेले मराठा युवकांवरील गुन्हे मागे घ्या

समन्वयक समितीकडून पालकमंत्र्यांना निवेदन
कराड दि. 11 (प्रतिनिधी) : सकल मराठा समाजाकडून क्रांतीदिनी मराठा आरक्षणाच्या मुद्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या आंदोलनावेळी मराठा समाजातील अनेक युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी जिल्हापोलीस प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मराठा बांधवांना दिले.
कराड तालुका मराठा समन्वयक समितीकडून मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके उपस्थित होते. चर्चेदरम्यान, पालकमंत्री शिवतारे म्हणाले, महाविद्यालयीन प्रवेश शुल्कातील 50 टक्के सवलतीत सरकारकडून केवळ शिक्षणशुल्कच माफ करण्यात येत असल्याने समाजाची फसवणूक होत आहे. त्याबाबतची सद्य परिस्थिती पालकमंत्री शिवतारेंच्या निदर्शनास ही आणून दिली. केवळ शिक्षण शुल्काचीच काही रक्कम माफ होत असेल तर ती बाब चुकीची आहे. शिक्षण शुल्काबाबत जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाची पाहणी करून मुख्यमंत्र्यांशी स्वत: त्याबाबत आपण स्वतः चर्चा करू असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, शिष्यवृत्ती आणि वसतिगृह भत्ता योजनेबाबतही चर्चेअंती शासन निर्णयात योग्य तो बदल करुन घेण्याचे प्रयत्न करू असे ही प्रतिपादन केले.
नवी मुंबईमधील मराठा आंदोलनावेळी खोणोली (चाफळ) ता. पाटण येथील रोहन तोडकर या युवकाला आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीसह आर्थिक व अन्य प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगून यासंदर्भात पालकमंत्री शिवतारे यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)