बंद झालेले स्मार्ट आरसी बुक पुन्हा मिळणार

200 रुपये शुल्क : आरटीओमधूनच मिळणार बुक

पुणे – वाहनांची नोंदणी होवून वर्ष उलटल्यानंतही आरसी बुक न मिळल्याचे प्रकार आता थांबण्याची शक्‍यता आहे. करार संपल्यानंतर बंद झालेले स्मार्ट आरसी बुकचे वाटप आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता हे आरसी बुक आरटीओ कार्यालयातून वितरीत केली जाणार आहे.

8 जानेवारीपासून नोंदणी होणाऱ्या वाहन चालकांना स्मार्ट आरसी बुक देण्यात येणार आहे. रोझ मार्टा या कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट आरसी देण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी नागरिकांना 200 रुपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे. आरसी बुक वितरणात अनेकदा दिरंगाई होत असल्याचे अनेक प्रकार झाले आहेत. त्यामुळे आता थेट आरटीओमधून आरसी वितरीत करण्यात येणार असून वाहन चालकांना कार्यालयात जावून आरसी घ्यावी लागणार आहे. दरम्यान ज्या वाहनधारकांकडे पेपर आरसी आहे. त्यांना स्मार्ट कार्ड आरसी काढायची असल्यास त्यांची नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरणे आवश्‍यक आहे. तसेच ही बाब वाहनधारकास ऐच्छिक आहे. परिवहन विभागाने एका खासगी कंपनीशी केलेला करार संपुष्टात आल्यानंतर डिसेंबरपासून वाहनधारकांना पेपर आरसी देण्यात येत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, परिवहन विभागाने पुन्हा स्मार्ट आरसी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या वर्षी आरसी स्मार्ट कार्ड स्वरुपात देण्यासाठी रोझ मार्टा कंपनीशी करार करण्यात आला होता. मात्र, त्या कंपनीला करारातील अटी व शर्ती मान्य नव्हत्या. त्यामुळेच स्मार्ट आरसीला विलंब होत होता. मात्र, आता परिवहन विभागाने करारातील काही अटी बदलल्यामुळे कंपनीने पुन्हा स्मार्ट आरसी देण्याचे काम सुरू केले आहे. स्मार्ट आरसी बंद झाल्यानंतर परिवहन विभागाकडून या आरसीची छपाई केली जात. यामध्ये विभागाकडून वाहनधारकांना या आरसी देण्यास विलंब होत होता. तसेच, मध्यंतरी आरसी छपाईसाठी लागणारा कागद उपलब्ध होत नव्हता. या सर्व कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी प्रलंबित आरसीची संख्या एक लाखावर पोहोचली होती. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने विशेष मोहीम राबवून सर्व आरसी पेपरची छपाई केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)