बंद जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात

20 नोव्हेंबर रोजी होणार चाचणी

पुणे – पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दि.20 नोव्हेंबर रोजी या जलवाहिनीची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

-Ads-

खडकवासला कालवा फुटीच्या दुर्घटनेनंतर हे काम 15 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदारास दिले होते. या बंद जलवाहिनीमुळे महापालिकेस दर दिवशी कालव्यातून गळती होणारे 150 एमएलडी पाणी वाचविणे शक्‍य होणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका यापूर्वी खडकवासला धरणाच्या कालव्यातून पर्वती आणि लष्कर जलकेंद्रासाठी पाणी घेतले जात होते. मात्र, कालव्याला गळती असल्याने खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत बंद जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता महापालिकेकडून या जलवाहिनीद्वारेच पाणी घेतले जात आहे. तर या जलवाहिनीत आलेले पाणी पुढे पर्वतीपासून लष्कर जलकेंद्रासाठी पुन्हा कालव्यात सोडले जाते.

मात्र, पर्वती ते लष्कर या 5 किलोमीटरच्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती असल्याने वर्षभरात सुमारे अर्धा टीएमसी पाणी वाया जाते. त्यामुळे 2015 मध्ये पर्वती जलकेंद्र ते लष्कर जलकेंद्रापर्यंत सुमारे 6.6 किमीची बंद जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात तब्बल 2.2 मीटर व्यासाची जलवाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे आता कालव्यातील महापालिकेला पाणी दिल्यानंतर पाण्याची गळती तसेच त्याबदल्यात पाटबंधारे विभागाला दरवर्षी 2 ते 3 टीएमसी पाण्याचे जादा पैसे देणेही बंद होणार असून सुमारे 100 कोटींची ही योजना आहे.

डिसेंबरमध्ये योजना सुरू करणार
या जलवाहिनेचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने 20 नोव्हेंबर रोजी या कामाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यात काही समस्या दिसून आल्यास त्या किरकोळ स्वरूपाच्या असल्यास पुढील 15 दिवसांत, तर मोठ्या असल्यास महिनाभरात सोडविण्यात येतील. त्यानुसार, काही अडचण नसल्यास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही जलवाहिनी सुरू करण्याचे नियोजन करण्यात असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)