“बंद’ च्या धास्तीने बाजारात गर्दी

पालेभाज्यांना मागणी : आंदोलनातही भाव स्थीर

पिंपरी – सकल मराठा समाजाने आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी दि. 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने बाजारात मंगळवारी नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी वर्दळ दिसून आली. एरवी मंगळवारी बाजार बंद असतो; परंतु आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी आज रोजच्या गरजेतल्या भाजीपाल्यासाठी गर्दी केली असल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले.
मागच्या महिन्यात सुद्धा मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार बंद असल्याचे संदेश मोबाईलवरून पसरवण्यात आले होते. त्यामुळे काही जणांनी त्याला प्रतिसाद देऊन दुकाने बंद ठेवली होती. तर काही जणांनी त्यांची दुकाने चालूच ठेवली होती. परंतु, यामुळे नागरिकांचा देखील खोळंबा झाला असल्याचे पहायला मिळाले होते. त्यावेळी बरेच नेहमीचे ग्राहक परतून गेले होते. त्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे या गुरुवारी काय होईल, ते आता सांगता येणे अशक्‍य आहे. परंतु, मागच्या मंगळवार पेक्षा जास्त गर्दी असल्याचे यावेळी बागवान ट्रेडर्स यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोजच्या तुलनेत बाजारात पालेभाज्याची आवक जास्त असल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये शेपू, कोथिंबीर, पालक आणि मेथीचा भरणा जास्त होता. त्यांचे भावही स्थीर असल्यामुळे नागरिकांनी दोन दिवसाची खरेदी एकदाच केली असल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले. गुरूवारी बाजारात पालेभाज्यांची आवक झाली नाही, तर यांचे भाव वाढतील. त्यामुळे नागरिकांनी पालेभाज्यांची खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

मार्केट यार्डातही रोजच्या तुलनेत आज टेम्पो आणि गाड्या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. त्यात बटाट्याच्या तीस गाड्याची आवक झाली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत बटाटे स्वस्त होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर बाजारत लसूण, कांद्यांची देखील आवक वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे गुरूवारी बाजार बंद राहिला तरी काही विक्रेत्यांनी त्यांच्या जवळ दोन दिवासांचा माल स्टॉक करून ठेवला आहे. त्यातही बुधवारचा दिवस शिल्लक असल्याने विक्रेत्यांना माल घेण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे बाजारावर त्याचा तेवढा परिणाम होणार नाही. परंतु, ग्राहकाने गुरूवारी बाजाराकडे पाठ फिरवल्यास आहे तो माल नंतरच्या येणाऱ्या दिवसात बेभाव विकण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले.

दैनंदिन जीवनात आवश्‍यक असलेल्या दुधावर आंदोलनाचे पडसाद उमटणेची शक्‍यता कमी आहे. दुध आवश्‍यक असल्याने ते बंद ठेवता येणार नाही. तरी दुधाचे येणे हे डिलरवर अवलंबून आहे. त्यांनी जर उपलब्ध करून दिले, तर आम्ही ते विकणार. अन्यथा त्यांच्याकडूनच दोन दिवसाचा स्टॉक करून ठेवावा लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची माहिती दैनिक “प्रभात’ ला दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)