बंद घरात चोरी करणाऱ्याला अटक

उरुळी कांचन – उरुळी कांचन येथील परिसरात दिवसाढवळया घर बंद बघून किंवा घरात कोणी नाही पाहून चोरी करणाऱ्या वैभव अमित जाधव (वय 20, रा.. नागपूर, तालुका अंबोली) याला अटक करण्यात आली आहे. या बाबत माहिती अशी की, उरुळी कांचन येथील परिसरात दिवसाढवळत मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरी करून चोर नेहमी पसार होत असे. मागील आठवड्यात झालेल्या चोरीचा अंदाज घेऊन एक चोर उरुळी कांचन येथील शिंदवणे रोड परिसरात पुन्हा चोरी करण्यासाठी शैलेश बाबर यांच्या घरात घुसला. घरी कोणी तरी आहे म्हणून चोरी करून पळून जात असताना शैलेश बाबर, स्वरूप कांचन, बालाजी दुरगुळे यांसह नागरिकांनी भरपावसात त्याला पाठलाग करून पकडले आणि या घटनेचा माहिती उरुळी कांचन येथील पोलिसांना दिली. उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी या घटनेची माहिती लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक बंडोपंत कौंडभैरी यांना दिली. त्यानुसार उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलिस शिरीष कामठे, सचिन पवार यांसह सर्वांनी तातडीने जाऊन अनिल वैभव जाधव यास अटक करण्यात आली आहे. आरोपींने उरुळी कांचन परिसरात चार ते पाच ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. या घटनेचा तपास उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पवार शिरीष कामठे व इतर कर्मचारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)