पिंपरी – पिंपळे सौदागर येथील एका कुलूप बंद रो हाऊसमधून चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम व लॅपटॉप असा एकूण आठ लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.
या प्रकरणी विशाल पटेल (वय-32, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मामा अरुण उद्धव पाटील (वय-62, रा. रा-हाऊस नंबर-1, गंगोध बंगला, गुलमोहर कॉलनी, विशालनगर) यांचे घर 3 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान बंद होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलूप कशाच्या तरी सहाय्याने उचकटून वॉर्ड रोब व बेडरुममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम 60 हजार रुपये व एक लॅपटॉप असा एकूण आठ लाख 30 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
What is your reaction?
0
Thumbs up
0
Love
0
Joy
0
Awesome
0
Great
0
Sad
0
Angry