बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

कोरेगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – कोरेगाव येथील अजिंक्‍य कॉलनी येथून अभिजित रामदास कांबळे (वय 37) यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडून रोख रकमेसह 1 लाख 40 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव शहरात अजिंक्‍य कॉलनी येथे अभिजित कांबळे हे घराला कुलूप लावून शेजारी जवळ असलेल्या घरांमध्ये कुटुंबासह गेले होते. दि. 29 रोजी रात्री 11 ते 3 च्या दरम्यान अज्ञात चोरांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील 1 लाख 40 हजाराची रोख रक्कम घेऊन पलायन केले. याबाबतची फिर्याद अभिजित कांबळे यांनी पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस उपनिरीक्षक चौगुले अधिक तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)