बंद कालव्याचा प्रस्ताव शासनाकडे

मंजुरीची प्रतीक्षा : 28 कि.मी.चा भूमिगत बोगदा

पुणे – खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान शहरामधून जाणारा सध्याचा कालवा बंद करून पाणी नेण्यासाठी भूमिगत बोगदा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी मुठा उजवा कालव्यातून वाहताना त्यामध्ये पडणारा कचरा आणि अन्य अनेक घटकांमुळे पाणी प्रदूषित होते. कालव्यातून पाण्याची गळती आणि चोरीही होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना ज्या अडचणी येतात त्या दूर करण्यासाठी या बंद जलवाहिनीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून कालव्यावाटे जे पाणी येते त्याची गळती मोठ्या प्रमाणावर होते. तसेच कालव्यातून पानी वाहताना तब्बल तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खडकवासला-वडगाव बुद्रुक-स्वारगेट- लष्कर- हडपसर आणि फुरसुंगी या भागातून जाणारा कालवा बंद करून 28 किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याची दोन हजार हेक्‍टर जागा असून या जागेची किंमत चालू बाजार मूल्य तक्‍त्यानुसार (रेडीरेकनर) तब्बल 20 हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे ही जागा पुणे महानगरपालिका किंवा पीएमआरडीए यांना विकासासाठी देऊन त्यातून प्रकल्पासाठी पैसे उभे करण्याचे नियोजन आहे. हा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार करून तो मागील आठवड्यात राज्य शासनाकडे सुपूर्द केला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)