बंदुक संस्कृतीविरोधात अमेरिकेत महाप्रचंड मोर्चा, 5 लाखांचा समावेश !

वॉशिंग्टन (अमेरिका) -बंदूक संस्कृतीच्या विरोधात अमेरिकेत वॉशिंग़्टन येथे महाप्रचंड मोर्चा काढण्यात आला. जगातील आजवरच्या या सर्वात मोठ्या मोर्च्यामध्ये 5 लाखांहून अधिक व्यक्तींचा सहभाग होता. वॉशिंग्टनप्रमाणेच संपूर्ण अमेरिकेत 700 पेक्षाही अधिक शहरांत अशाच प्रकारचा मोर्चा काढण्यात आला होता आणि अमेरिकेप्रमाणेच लंडन (ब्रिटन), टोकियो (जपान,), सिडनी (ऑस्ट्रेलिया), मुंबई (भारत)सह जगभरातील 100 पेक्षा अधिक शहरांमध्ये अशाच प्रकारचे बंदूक संस्कृती विरोधात मोर्चे काढण्यात आले.

40 दिवसांपूर्वी अमेरिकेतील फ्लॉरिडा या शहरातील शाळेत झालेल्या बंदूक हल्ल्यात 17 जण मरण पावले होते. त्यानंतर बंदूक संस्कृतीच्या विरोधात सुरू झालेल्या बंदूक नियंत्र्रण मागणीचे रुपांतर शनिवारी महाप्रचंड मोर्चात झाले. या मध्ये अनेक सेलेब्रिटीजनी भाग घेतला. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हिम्मत बांधून पुढे आलेल्या अमेरिकन बांधवांचे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॅक पार्किसन्स यांनी कौतुक केले आहे. या प्रकरणात राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन याहून कठोर उपाययोजना करण्या येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षिततेसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे त्यांनी अगोदरच जाहीर केलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)