बंदी असतानाही जडमालावाहू वाहनांची सर्रास ये-जा

चिंबळी- पुणे-नाशिक राष्ट्रीय मार्गावरून चिंबळी फाटा ते आळंदीकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्सावर जडमालावाहू वाहनांना बंदी आहे. तरी मोशीचा टोलनाका चुकविण्यासाठी हे जडमालवाहू वाहने या रस्त्याने दामटत आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी या वाहनांचा महावितरणच्या तारांना धक्का लागल्याने स्पार्किंग तर झालेच शिवाय या तारा तुटल्या देखील. सुदैवाने यात कोणती दुर्घटना घडली नाही. दरम्यान, या वाहनास थांबविण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला मात्र, वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने दामटल्याने नागरिकांनी त्यास थांबविण्याचा नाद सोडला. तरी या मार्गाने जडमालवाहतुकीला बंदी असतानाही ही वाहने या मार्गाने जा-ये कशी करता? संबंधित विभाग झोपा काढतो का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तरी या रस्त्याने होणाऱ्या जडमालवाहू वाहनांवर कारवाई करवाई, अशी मागणी जोर धरीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)