बंदीच्या बडग्याने थर्माकोल कलाकुसरीवर कुऱ्हाड

पुणे- शासनाने घेतलेल्या प्लॅस्टिकबंदी निर्णयात थर्माकोल निर्मिती आणि वापरासही बंदी घातली आहे. त्यामुळे थर्माकोलची कलाकुसर करून उपजीविका भागविणारे अनेक कलावंत बेरोजगार होत आहेत. शासनाने ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणी थर्माकोल कलाकार विक्रेते असोसिएशनने केली आहे.

थर्माकोल विघटणाचा आहवाल शासन दरबारी सादर करू. परंतु या वर्षीसाठी शासनाने कलाकारांना मुभा द्यावी.
– विशाल कुल, थर्माकोल व्यापारी.

प्लॅस्टिक बंदीसोबतच शासनाने थर्माकोलबंदी केली आहे. मात्र, थर्माकोल हे विघटनशील आहे, असा दावा संघटनेने केला आहे. यासंबंधी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेचे कलाकार आणि व्यावसायिक उपस्थित होते. या निर्णयाबाबत न्यायालयात धाव घेतल्याचेही असोसिएशनने सांगितले आहे.

थर्माकोलचा पुनर्वापर करून त्यापासून शर्टची बटण, आर्टीफिशियल दागिने अशा उपयोगी वस्तू तयार केल्या जातात. असे या कलाकारांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या थर्माकोलच्या सजावट वस्तूंची तयारी ही वर्षभर आधीपासून करावी लागते. शासनाने 23 मार्च रोजी थर्माकोलला बंदी अध्यादेश काढला. त्यामुळे अनेक कलाकारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. तसेच वर्षभर कष्ट करुन तयार केलेल्या या मालाची विल्हेवाट आम्ही कशी लावावी आणि खर्चाची रक्कम कशी उभी करावी, याचे उत्तर सरकारने द्यावे, असे यावेळी सुनील कांचन म्हणाले.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)