बंदला शिरवळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरवळ ः व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवत मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

शिरवळ, दि. 9 (प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी शिरवळमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळला. गुरुवारी व्यापारी व नागरिकांनी बंद पुकारत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांच्यासह अनेक मराठा बांधवांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्यानंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चाची जागा मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या शिरवळ बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिरवळसह परिसरात बंदच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक परिसरातील कंपन्यांच्या व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक सुट्टी जाहीर करत आजची सुट्टीचा दिवस रविवार रोजी कामासाठी ठेवल्याने औद्योगिक परिसराबरोबर आशियाई महामार्गावर वाहतूक नसल्याने निरव शांतता पसरली होती.
यावेळी शिंदेवाडीसह मराठा समाजबांधवांनी ग्रामपंचायतीलगत ठिय्या आंदोलन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शिरवळ, पळशी,खंडाळा, लोणंद, विंग या प्रमुख गावांसह संपूर्ण खंडाळा तालुक्‍यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शिरवळहद्दीवरील एक खाजगी कंपनी सुरु असल्याने आंदोलक युवकांनी कंपनी बंद करण्याकरीता गेले असता त्याठिकाणी कंपनी सुरक्षारक्षक, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर वातावरण तप्त झाले होते. यावेळी शिरवळ पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. यावेळी चौकाचौकात पोलीसांचा व महामार्गावर मोठ्या प्रमाणात शिरवळ पोलिसांनी शिरवळ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त नेमण्यात आला होता.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)