बंदरातून होणाऱ्या माल वाहतुकीत झाली वाढ

नवी दिल्ली: एप्रिल ते जुलै 2018 च्या कालावधीत देशातल्या प्रमुख बंदरांमधून एकूण 231.48 दशलक्ष टन मालवाहतूक झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ती 4.13 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी ती 222.29 दशलक्ष टन होती. कोलकाता (हल्दियासह) पॅरादीप, विशाखापट्टणम्‌, कामराजार, चेन्नई, कोचीन, न्यू मंगलोर, जेएनपीटी आणि दीनदयाळ (कांडला) या नऊ प्रमुख बंदरांमधल्या वाहतुकीत वाढ झाली.

दीनदयाळ (कांडला) बंदरातून सर्वाधिक 38.76 दशलक्ष टन (16.74 टक्के वाटा) वाहतूक झाली. त्यापाठोपाठ पॅरादीप 35.68 दशलक्ष टन (15.41 टक्के वाटा) आणि जेएनपीटी 23.25 दशलक्ष टन (10.05 टक्के वाटा) यांचा क्रमांक लागतो. विशाखापट्टणम 21.52 दशलक्ष टन (9.30 टक्के वाटा) आणि मुंबई 19.57 दशलक्ष टन (8.45 टक्के वाटा) यासह चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. या पाच बंदरांमधून 60 टक्के वाहतूक झाली.
पीओएल घटकांचा वाटा सर्वाधिक 32.53 टक्के राहिला. त्यापाठोपाठ कंटेनर (20.86 टक्के), औष्णिक व वाफेवरचा कोळसा (15.78 टक्के) यांचा वाटा राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)