बंजी जंपिंग करताना नताशा बचावली

बहुतेक कलाकार मंडळींना शुटिंगदरम्यान स्टंट करायला लागतात. त्याची क्रेझ इतकी वाढत जाते की प्रत्यक्ष आयुष्यातही अशा प्रकारच्या स्टंट करण्यासाठी ते मागेपुढे बघत नाहीत. पण त्यातून काही वेळा जीवघेणा प्रसंगही उद्‌भवण्याची शक्‍यता असते. नताशा सूरीच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. मनिष पॉलबरोबर “बा बा ब्लॅक शीप’मध्ये काम करणारी नताशा एका लग्झरी स्टोअरच्या उद्‌घाटनासाठी इंडोनेशियाला गेली होती. उद्‌घाटनाचा कार्यक्रम संपल्यावर ती इंडोनेशियातल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी गेली. तिथे काही ऍडव्हेंचर स्पोर्टसचा आनंद घेण्यासाठी नताशाने आपला मुक्काम आणखी काही दिवस वाढवला. इंडोनेशियामध्ये “बंजी जंपिंग’ प्रसिद्ध आहे. म्हणून नताशानेही हे धाडस करायचे ठरवले. नियोजनाप्रमाणे तिने जंप तर केले. मात्र खाली वेगाने येत असलेल्या नताशाच्या पायाला बांधलेली दोरी सुटली आणि कोणत्याही आधाराशिवाय नताशा वेगाने खाली असलेल्या नदीमध्ये कोसळली. इतक्‍या उंचावरून वेगाने खाली पडल्यावर तिचे वाचणे अवघडच होते. नदीमध्ये पडल्यामुळे तिचा जीव थोडक्‍यात वाचला. मात्र तिला गंभीर दुखापत मात्र झाली. तातडीने हालचाल करून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. डॉक्‍टरांनी तिला “अंडर ऑब्जर्व्बेशन’ ठेवले आहे. अजूनही नताशा हॉस्पिटलमध्येच डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली उपचार घेते आहे.

2006 मध्ये “फेमिना मिस वर्ल्ड’ किताब नताशाने पटकावला आहे. त्याच वर्षी झलेल्या “मिस वर्ल्ड’ स्पर्धेमध्ये नताशा आघाडीच्या 10 स्पर्धक सौंदर्यवतींमध्ये होती. 2016 मध्ये “किंग लायर’ नावाच्या मल्याळम सिनेमामधून नताशाने आपल्या ऍक्‍टिंग करिअरला सुरूवात केली आहे. त्याशिवाय तिने “बिग स्वीच’, “सुपर ड्युड’, “सेल गुरू’ आणि “स्टाईल पोलिस’ यासारख्या काही “टिव्ही शो’चे होस्ट म्हणूनही काम केले आहे. “इनसाईड एज’ नावाच्या एका वेब सिरीजमध्येही तिने काम केले आहे. मल्याळममध्ये बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळालेली नताशा बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करते आहे. “बा बा ब्लॅक शीप’ रिलीज होतो आहे. आता तिने लवकरात लवकर हॉस्पिटलामधून बरे व्हावे आणि भारतात यावे आणि आपल्या सिनेमाचे लॉंचिंग बघावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)