बंगाल, आंध्रप्रदेश पाठोपाठ छत्तिसगढमध्येही सीबीआयला नो एन्ट्री 

रायपूर – पश्‍चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांपाठोपाठ छत्तिसगढनेही सीबीआयला नो एन्ट्रीचा संदेश दिला आहे. छत्तिसगढमधील कॉंग्रेसच्या नव्या सरकारने त्या राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली परवानगी रद्द केली आहे. तसे पत्र मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवले आहे. त्यामुळे यापुढे छत्तिसगढमध्ये तपास करण्यासाठी किंवा छापा टाकण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

सीबीआयच्या प्रमुखपदावरून अलोक वर्मा यांची हकालपट्टी झाल्याच्या दिवशीच छत्तिसगढ सरकारच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. मोदी सरकारकडून सीबीआयचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी लावून धरला आहे. बंगाल, आंध्र आणि आता छत्तिसगढ सरकारांच्या निर्णयाला त्या आरोपाची पार्श्‍वभूमी आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)