बंगाली चित्रपट निर्माते श्रीकांत मोहता यांना सीबीआयकडून अटक

कोलकाता: बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते श्रीकांत मोहता यांना रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. मोहता यांनी रोज व्हॅलीची 25 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

रोज व्हॅलीकडून पैसे स्वीकारल्यासंदर्भात मोहता यांना सीबीआयच्यावतीने नोटीस बजावण्यात आली होती. सीबीआयच्या पथकाने दक्षिण कोलकातातील शॉपिंग मॉलमधील मोहता यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची चौकशीही केली. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी नेण्यात आले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. सीबीआयच्यावतीने शारदा आणि रोज व्हॅली या दोन्ही चिट फंड गैरव्यवहारांचा तपास केला जात आहे. रोज व्हॅली प्रकरणाचा तपास सक्‍तवसुली संचलनालयाच्यावतीनेही केला जात आहे. रोज व्हॅलीचे अध्यक्ष गौतम कुंडू सध्या मनी लॉंडरिंग प्रकरणामध्ये तुरुंगातच आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोहता यांची कंपनी श्री वेंकटेश फिल्म्सने चोखेर बाली, मेमरीज इन मार्च, ऑटोग्राफ, रेनकोट आणि इति मृणलिनी यासारख्या गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. मोहता यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटांचे पूर्व भारतात वितरण देखील केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार आणि दिग्दर्शकांनी मोहता यांची निर्मिती असलेल्या चित्रपटांसाठी काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)