बंगळूरू-पुणे विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग

नवी दिल्ली: बंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने हे अचानक लॅंडींग करण्यात आले. या विमानात 169 प्रवासी होते. ते सर्वजण सुखरूप आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्‌डाण घेतच विमानातील इंजिनचे काम अचानक बंद पडले. त्यानंतर पायलटने सतर्कता दाखवत इमर्जन्सी लॅंडींग करण्याचा निर्णय घेतला. हे विमान गो एयर या कंपनीचे आहे. या विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे. वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

विमानाचे लॅंडींग केल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या सर्व प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येणार असून प्रवाशांची गैरसोय झाल्याने कंपनीकडून माफी मागितली आहे. दरम्यान, मागच्या काही काळात अशाप्रकारे विमानामध्ये बिघाड होऊन इमर्जन्सी लॅंडींग होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
चौकट

हैद्राबादमध्येही इमर्जन्सी लॅंडींग
याबरोबरच हैद्राबादमध्येही एअर एशियाच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले होते. हे विमान अमृतसरहून बंगळुरुला जात होते. विमान हवेत असताना विमानातील कर्मचाऱ्यांना अचानक त्यातून धूर येत असल्याचे निदर्शनास आहे. याबाबत त्यांनी त्वरीत हवाई ट्रॅफीक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर इमर्जन्सी लॅंडींग करण्याचा निर्णय घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)