बंगळुरूच्या विद्यार्थ्यांनी बनवली ‘हर्ट अटॅक’ची पूर्वकल्पना देणारी स्मार्ट गोळी

संग्रहित छायाचित्र

बंगळुरू: हृदयरोग हा मानवजाती पुढील एक प्रमुख आव्हान बनला आहे. जगामध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढत असल्याने दरवर्षी सुमारे 1.73 कोटी लोक हृदयरोगाचे बळी ठरत आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते  2025 पर्यंत हृदयरोगाचे बळी जवळपास 2.5 कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. हृदयरोगावर मात करण्यासाठी जगभरामध्ये संशोधन सुरु आहे. दरम्यान बंगळुरूच्या विसवेश्वराया इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी हृदयरोगाचे योग्य वेळी निदान व्हावे यासाठी एक स्मार्ट गोळी तयार केली आहे.

या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही ‘स्मार्ट’ इलेक्ट्रॉनिक गोळी रुग्णाच्या शरीरामध्ये सोडल्यानंतर रुग्णाच्या हृदयाच्या आरोग्याची निगराणी करते तसेच काही धोका जाणवल्यास रुग्णाच्या नातेवाइकांस तसेच जवळच्या हॉस्पिटलला रुग्णाचे लोकेशन व आरोग्यविषयक माहिती पाठवते.

विशेष म्हणजे या गोळीमध्ये कोणतीही बॅटरी वापरण्यात आली नसल्याने रुग्णांच्या आरोग्याला यापासून कोणतीच बाधा पोहचणार नाही. तसेच या गोळीची किंमत देखील सर्वसामान्यांना परवडेल अशी असणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या संशोधनाला एक्सेंचर इंनोव्हेशन २०१८ हा पुरस्कार देखील मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)