‘बँड बाजा बंद दरवाजा’मध्‍ये मुकेश तिवारी साकारणार भूताची भूमिका

सोनी सब नवीन मालिका ‘बँड बाजा बंद दरवाजा’सह २०१९ची सुरुवात धुमधडाक्‍यात करण्‍यास सज्‍ज आहे. मुकेश तिवारी अभिनीत ही हॉरर-कॉमेडी मालिका प्रेक्षकांना ‘भूतिया ट्विस्‍ट’सह रोलर-कोस्‍टरवर घेऊन जाईल. चित्रपटांतील आपल्‍या सर्वोत्‍तम अभिनयासाठी ओळखला जाणारा हा अभिनेता एका नवीन अवतारामध्‍ये दिसणार आहे, तो म्‍हणजे ‘भूत’. संजीव शर्माची भूमिका साकारणारा मुकेश आपल्‍या वैयक्तिक सूडासाठी आणि ‘विचारपूर्वक घेतलेला सूड चांगलाच असतो’ ही उक्‍ती सिद्ध करण्‍यासाठी एका कुटुंबाला भू‍त बनून घाबरवतो.

‘बँड बाजा बंद दरवाजा’ ही संजीव शर्माची कथा आहे. तो २५ वर्षांनंतर त्‍याच्‍या पूर्ण होऊ न शकलेल्‍या प्रेमिकेच्‍या जीवनामध्‍ये भूत बनून परत येतो. संजीवचे सरिता नावाच्‍या मुलीसोबत विवाह होणार असतो, पण ती तिचा प्रेमी चंदन खुरानासोबत पळून जाते. तो याच गोष्‍टीचा बदला घेण्‍यासाठी परत येतो आणि त्‍यांच्‍या मुलाला त्रास देऊ लागतो. संजीवचा विवाह न झाल्‍याने तो एकाकी जीवन जगतो. त्‍याची इच्‍छा असते की, सरिता व चंदनचा मुलगा रॉकीने देखील त्‍याच्‍यासारखेच जीवन जगावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वोत्‍तम कलाकार व लक्षवेधक पटकथेसह ‘बँड बाजा बंद दरवाजा’ लवकरच २०१९ मध्‍ये सोनी सबवर सुरू होत आहे. या भूमिकेबाबत बोलताना मुकेश तिवारी म्‍हणाला, ”मी सोनी सबवरील मालिका ‘बँड बाजा बंद दरवाजा’मध्‍ये हॉरर-कॉमेडी शैली सादर करण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. एक अभिनेता म्‍हणून मी विविध शैलींच्‍या भूमिका साकारण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. म्‍हणूनच ही मालिका स्‍वीकारताना मी अधिक विचार केला नाही. मी या नवीन विनोदी मालिकेसह दर्शकांचे मनोरंजन करण्‍यास उत्‍सुक आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)