बँक कर्मचारी संपावर गेल्याने ग्राहकांचे हाल

मुंबई:  बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ देशभरातील सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (यूएफबीयू) ने या संपाची हाक दिली आहे. महिन्याच्या अखेरीस झालेल्या या संपामुळं सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे.

बँक संघटनांनी संपाची हाक दिल्यामुळे आज ठिकठिकाणच्या सरकारी बँकांच्या बाहेर संपाची माहिती देणारे फलक झळकलेले दिसत आहेत. त्यामुळे दैनंदिन कामासाठी बँकांमध्ये आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत फिरावे लागत आहे. कर्मचारी संपावर गेले असल्याने बँका ओस पडल्या आहेत. परिणामी खातेदारांना ऑनलाइन व्यवहार व एटीएमवरच अवलंबून राहावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)