बँकॉकमध्ये पार पडली भारत-पाक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक

 बँकॉक : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक बँकॉकमध्ये पार पडल्याची माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासिर खान(निवृत्त) या दोघांची भेट बँकॉकमध्ये पार पडली. मात्र कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा या बैठकीशी काहीही संबंध नव्हता असे स्पष्टीकरण देण्यात आले.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक बँकॉकमध्ये होणार हे पूर्वनियोजित होते. महिनाभर आधीपासून ही भेट ठरली होती अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पाकिस्तानच्या सैन्य दल प्रमुखांना या बैठकीची माहिती मिळाली होती असेही समोर आले आहे. या बैठकीत अजित डोवल यांनी पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला अशी माहिती मिळते आहे. तसेच काश्मीर प्रश्न, भारत आणि पाक सीमेवरचा तणाव हे मुद्देही या बैठकीत भारताने उपस्थित केले. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात यावर्षी भारताचे ३१ जवान शहीद झाले अशीही माहिती मिळाली आहे.

-Ads-

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक तिसऱ्याच देशात होणे ही बाब काही नवी नाही. याआधी डिसेंबर २०१५ मध्येही दोन्ही परराष्ट्र सचिवांमध्ये अशीच एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीची माहितीही प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नव्हती. मात्र २६ डिसेंबरला झालेल्या बैठकीत नेमके काय घडले? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)