बँका आता जनतेचा पैसा वसूल कसा करणार, जाहीर करावे – धनंजय मुंडे

पंढरपूर: डीएचएफएल कंपनीच्या माध्यमातून ३१ हजार कोटी रुपयांचा भाजपचा नवा घोटाळा समोर आला आहे. यामधील २० कोटी रुपये भाजापच्या खात्यात जमा झाले आहेत, असे सांगतानाच जनतेचा हा पैसा बँका आता वसूल कसा करणार, हे जाहीर करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली.

डीएचएफएल कंपनीने तब्बल ३१,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खुलासा कोब्रापोस्ट या वृत्तसंस्थेने केला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच धक्कादायक म्हणजे डीएचएफएलने मोठ्या प्रमाणात निधी अवैध पद्धतीने भाजपला दिल्याचे कोब्रापोस्ट म्हटले आहे.

-Ads-

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू म्हणत होते, परंतु चार वर्षे झाली तरी सातबारा कोरा झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर आंदोलने केल्यानंतर सरकारला जाग आली आणि नंतर सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. परंतु हे सरकार इतके खोटे बोलते की, जाहीर केलेली कर्जमाफीही अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही, असा आरोपही मुंडे यांनी केला.

इमानदार चौकीदार आज देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही, अशा शब्दांत त्यांनी नरेंद्र मोदींचा समाचार घेतला. २ कोटी नोकर्‍या देणार म्हणून तरुणाई ‘हर हर मोदी घर घर मोदी’ म्हणत उड्या मारत होती. परंतु नोकरीच्या आमिषाने आपल्याला फसवले हे लक्षात आल्यावर आज हीच तरुणाई दबक्या आवाजात बोलू लागली आहे. कुठे सोयरीकही जुळली नाही, असे सांगू लागली आहे. दिवसाढवळ्या जनतेच्या पैशाची लूट केली, ते भाजपावाले कुठल्या तोंडाने मते मागायला येणार आहेत, अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)