“फ्लोटिग वॉटर ड्रोन’ काढणार नदीपात्रातील निर्माल्य

पिंपरी – गणेशोत्सवादरम्यान गोळा होणाऱ्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला गणेश विसर्जन करताना नदीपात्रात टाकलेले निर्माल्य काढण्यासाठी “फ्लोटिग वॉटर ड्रोन’चा वापर करणार आहे. त्याच्या सहाय्याने पाण्यात न उतरता पाण्यावर तरंगणारे निर्माल्य व इतर वस्तू काढणे शक्‍य होणार आहे. विसर्जनादरम्यान प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर केला जाणार आहे.

चिंचवड येथील पवना नदी विसर्जन घाटावर या “ड्रोन’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी संजय खोत आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-

याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. ते म्हणाले, “फ्लोटिग वॉटर ड्रोन’च्या सहाय्याने नदीच्या पाण्यावरील तरंगते प्लॅस्टिक, फुले, निर्माल्य, वनस्पती, थर्माकोल इत्यादी काढून नदी स्वच्छ केली जाऊ शकते. त्यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा नागरिकाला पाण्यात उतरण्याची आवश्‍यकता नाही. हे मशीन “बॅटरी ऑपरेटेड’ असून रिमोट कंट्रोलव्दारे हे मशीन नियंत्रित होते. या मशीनचे वजन अंदाजे 40 किलो असून एकावेळी 350 किलो कचरा त्याव्दारे नदीतून काढला जातो.

याव्यतिरिक्त अग्निशामक दलाकडून गणेश मूर्ती विसर्जनाकरिता जीवरक्षक व साहित्य, उपकरणे यांची या घाटावर व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व आठ प्रभाग स्तरावर कामे करण्यात आली आहेत. घाटांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच निर्माल्य कुंड्यांची देखील व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी कुड्यांमध्येच निर्माल्य टाकावे असे आवाहनही गावडे यांनी केले आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)