फ्लॉवर स्पर्धेत चारजण ठरले अव्वल

कराड, दि. 26 (प्रतिनिधी) – येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनस्थळी सोमवारी घेण्यात आलेल्या फ्लॉवर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या जातीची आकर्षक फुले व त्याची मांडणी असल्याने परीक्षकांना क्रमांक काढणे अवघड झाले. प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तिन्ही क्रमांकामध्ये प्रत्येकी तीन क्रमांक द्यावे लागले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक आबासाहेब भोसले (कोलवडी-ग्लॅडियन), गुरूदेव मोरे (सासुर्णे-वेलवेट), प्रशांत हिंदुराव गरूड (येणके-कॉस्कर्न) व दत्ताजी चव्हाण (पेरले- गुलाब) या सर्वांनी प्रथम क्रमांक पटकावला. सारीका पाटील (राजमाची-कार्नेशन), दादासाहेब मोकाशी कृषी विद्यालय (राजमाची), सोमनाथ सुतार (चरेगांव- निशिगंधा) या सर्वांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस जोतीराम माने (चरेगाव- लिली), सुजाता पाटील (तांबवे- झेंडू) व अजित पाटील (मांडवे-कार्नेशन) यांनी पटकावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)