ठाणे – देशातील सर्वात मोठ्या 26 किमी लांबीच्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये सध्या जवळपास वीस हजार ग्रेटर फ्लेमिंगो व लेसर फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी ऐरोली येथील ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य ऑफिसमधून तिकीट काढून पर्यटक आणि पक्षीप्रेमी बोटीने जात आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत या पक्ष्यांचे वास्तव राहिल, असा पक्षीप्रेमींचा अंदाज आहे. हजारोंच्या संख्येने आलेल्या या परदेशी पाहुण्यांचे छायाचित्र टिपले आहे कराड येथील पक्षी अभ्यासक रोहन भाटे यांनी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)