फ्लेक्‍स लावून वक्तव्याचा निषेध

पुणे – कालव्याच्या कडेने अतिक्रमण झाल्याने परिसरात उंदीर, घुशी, खेकड्यांची संख्या वाढली. उंदीर, घुशींनी जमीन पोखरल्याने कालवा फुटला असल्याचे विधान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस अशा आशयाचा प्लेक्‍स लावून खरपुस समाचार घेतला.

स्वारगेट परिसरातील पुलाखाली राष्ट्रवादीने फ्लेक्‍स लावून या वक्तव्याचा निषेध केला. दांडेकर पूल चौक परिसरात घडलेल्या जलतांडवानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी कॅनॉलच्या कामाची पाहणी केली. तसेच यातील बाधींताची भेट घेतली. यानंतर बोलताना त्यांनी हा प्रकार उंदीर आणि घुशींमुळेच घडल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे फ्लेक्‍स लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)