फ्लॅट देण्याच्या अमिषाने सहा लाखाची फसवणूक करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे- फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 6 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ब्रिजेश नटवरलाल राठोड (वय 42, रा. प्रिया हाईट सोसायटी, विश्रांतवाडी) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. तर मनू तिवारी आणि त्रिशा तिवारी (दोघेही, रा. मॅजिस्टीक सिटी, वाघोली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्ररणी केज राजन जासेफ (वय 27, रा. मारीया हॉटेलसमोरस वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार 8 डिसेंबर 2017 ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत घडला. आरोपींनी फिर्यादी यांना वाघोलीतील मॅजिस्टीक सिटी या गृह प्रकल्पातील एक प्लॅट दाखवला होता. फ्लॅट खरेदी करण्यापुर्वी आरोपींनी जासेफ यांच्याकडून 4 लाख रुपये आगावु रक्कम घेतली. त्यानंतर ना हरकत दाखला आणि सदनिका हस्तांतरणासाठी 2 लाख असे एकूण 6 लाख घेतले. मात्र फ्लॅटचा ताबाच दिलाच नाही. त्यामुळे जासेफ यांनी आरोपींकडे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र, पैस आणि फ्लॅट दोन्हीही न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी राठोड याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी पुढील तपासासाठी राठोड याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. ती मान्य करीत न्यायालयाने त्याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)