फ्लॅट आणि घरावरचा जीएसटी कमी होणार

अलीकडच्या काळात जीएसटी कौन्सिलने अनेक वस्तूंवरच्या करआकारणीत कपात केली आहे. अर्थात घर खरेदी करणाऱ्यांसाठी देखील चांगली बातमी लवकर येईल, असे चिन्हे आहेत. कारण निर्मिती अवस्थेत असलेले आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट नसणाऱ्या फ्लॅट किंवा घरावरचा जीएसटी कमी होऊ शकतो.

जीएसटी कौन्सिल ही पुढील बैठकीत बांधकाम अवस्थेतील निवासी प्रकल्प आणि कम्प्लिशन सर्टिफिकेटच्या प्रतिक्षेत असलेल्या रेडी पझेशनच्या फ्लॅटवरील जीएसटीत पाच टक्‍क्‍यांपर्यंत कपात करण्याचे सूतोवाच केले आहे. सध्याच्या काळात ज्यांना घराचा ताबा मिळालेला नाही आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेले नाही अशा रेडी पझेशनवर जीएसटीचा दर 12 टक्के आहे. अर्थात ज्यांचा विक्रीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा घरावर जीएसटी आकारला जात नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 12 टक्के जीएसटीचा भार हा कायद्याने हा बिल्डरकडून वेळोवेळी भरल्या जाणाऱ्या करांमुळे कमी होणे अपेक्षित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरीकडे ग्राहकाला बांधकाम अवस्थेतील घरांवर पाच ते सहा टक्के जीएसटी भरावा लागतो. कारण बिल्डरने उत्पादन साहित्यावर भरलेल्या कराचा लाभ हा प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचत नाही. यामुळे जीएसटी परिषदेत या करकपातीच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला. 80 टक्‍क्‍यांपर्यत पूर्ण झालेल्या घरावरचा जीएसटी हा पाच टक्‍क्‍यांपर्यंत करण्याचा विचार केला जात आहे. सध्याच्या काळात बिल्डर हा बांधकाम अवस्थेतील वस्तूंवर रोख रुपात कर भरत आहे. फ्लॅट आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मालावर आणि सेवांवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. तर सिमेंटवर तब्बल 28 टक्के जीएसटी आकारण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)