फ्लॅटवर लोनच्या देण्याच्या बहाण्याने 1 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक

पुणे- फ्लॅटवर लोन करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून ती कागदपत्र बनावट असल्याचे सांगत 1 लाख 15 हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नऱ्हे येथे राहणा-या 37 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र प्रकाश पवार(वय 26, रा. दिघी) आणि डेव्हीड ऍन्थनी लोपीस (वय 27, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या प्लॅटवर लोन करून देतो असे सांगितले. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचे खरेदी दस्त आणि इतर कागदपत्रे त्यांना दिली. मात्र ही सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांच्या या धमक्‍यांना घाबरून फिर्यादी यांनी गेल्या वर्षभरात 1 लाख 15 हजार रुपये त्यांना दिले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)