फ्लॅटला लागलेल्या आगीतून पाच जणांना वाचवले

अकलूजम येथे कॉम्प्लेक्‍सच्या चौथ्या माळ्यावरील घटना

अकलूज- अकलूजमध्ये गणेशनगर भागातल्या जाधव कॉम्प्लेक्‍समधील चौथ्या माळ्यावर राहत असलेल्या डॉ.शिवाजी नरळे यांच्या फ्लॅटला अचानक आग लागल्याने फ्लॅटमध्ये असलेले टीव्ही, गॅस शेगडी, वॉशिंग मशीन आणि इतर फर्निचर जळून खाक झाले; परंतु या फ्लॅटमधील पाच माणसांना वाचविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

येथील दुकानदार अमोल जोंजाळ यांनी रात्री दूरध्वनीवरून ही घटना अकलूज पोलीस स्टेशनला कळवल्यामुळे जीवित हानी झाली नाही. यावेळी नाईट राऊंड ड्युटीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी आपले पोलीस सहकारी संतोष घोगरे, सुधीर शिंदे, अविनाश मोरे, आर. एस. शिंदे, महेश पाटील, संतोष बोंदरे, तसेच पोलिसांना सतत सहकार्य करत असलेले विशाल साठे, होमगार्ड संजय सुरवसे, महेश वजाळे, सागर देखणे, सोमेश्वर पवार आणि रोहित भोसले यांना बरोबर घेऊन घटनास्थळी जाऊन माळीनगर, शंकरनगर, पंढरपूर व अकलूज ग्रामपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या टॅंकरने ही आग त्वरित विझवली.

यावेळी फ्लॅटमध्ये असलेल्या डॉ. शिवाजी नरळे यांच्या पत्नी सुप्रिया, मुलगी पूजा आणि श्रीजा, मुलगा तनिष्क यांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. या घटनेच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सोलापूर यांनी पथकाचे कौतुक केले असून, कोल्हापूर महापरीक्षेत्राचे पोलीस महासंचालकांनी 34 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)