फ्लॅटचे कुलूप उचकटून ऐवज लंपास

पुणे – फ्लॅटचे कुलूप उचकटून आत शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी असा ऐवज लंपास केला, तसेच याच इमारतीतील दुसरा फ्लॅटही फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला. 27 ते 28 ऑगस्ट या कालावधीत कोथरुड येथील आयडीयल कॉलनीतील अनुश्री अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. सागर कानेकर (वय 32, रा. कोथरुड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानेकर हे काही कामानिनित्त कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी असा 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला, तसेच याच इमारतीत राहणाऱ्या वंदना गोडबोले यांचाही फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला. सहायक पोलीस निरीक्षक एम. व्ही. राऊत अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)