फ्लिपकार्ट ‘बिग दिवाळी सेल’मध्ये मिळतोय ८० टक्क्यापर्यंत डिस्काउंट 

दिवाळी काही दिवसांवरच येऊन ठेपलेली असून फ्लिपकार्टवर ‘बिग दिवाळी सेल’ची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि अन्य सामानावर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. आजपासून सुरु झालेला हा सेल ५ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये जवळपास सर्वच कॅटगरीमध्ये मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यातही मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, कपडे आणि टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. परंतु, यामध्येही नोकिया 5.1 प्लस, ऑनर 9एन, रियलमी 2 प्रो आणि Alcatel A3 यासारख्या टॉप १० मोबाईलवर सर्वात जास्त डिस्काऊंट मिळत आहे. ऑनर 9एन मोबाईलची किंमत १३,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलअंतर्गत तो केवळ ९ हजार रुपयांना खरेदी करत येऊ शकणार आहे. यातही जर तुमच्याकडे स्टेट बँक इंडियाचे (एसबीआय) डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर १० टक्के आणखी डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल ग्राहकांसाठी पर्वणी ठरणार यात शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)