फ्लाईट रद्दमुळे होणारे नुकसान आणि ग्राहक

विमान प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. विमान कंपन्यांतील स्पर्धा आणि कमी दरात वेगवान प्रवास या कारणामुळे प्रवाशांचा ओढा विमानाकडे वाढत चालला आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे विमान रद्द होणे, विलंब होणे यासारख्या प्रकारातही वाढ झाली आहे. त्यामुळे इच्छितस्थळी लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने निघालेल्या प्रवाशाला कधी कधी विमानतळावरच रात्र काढावी लागते. म्हणून नागरी उड्डयन मंत्रालयाने प्रवाशाला भरपाई देण्याच्या नियमात बदल केले आहेत. या नियमाच्या आधारे प्रवासी विमान कंपन्यांविरुद्ध नुकसानभरपाईसाठी दावा करू शकतो. नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार, खराब हवामान, तांत्रिक बिघाड, दहशतवादी हल्ला यासारख्या कारणांमुळे विमानसेवा विस्कळीत किंवा बाधित होऊ शकते. अशावेळी अनोळखी ठिकाणी असलेल्या विमान प्रवाशाला योग्य मार्गदर्शन मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे हजारो रुपये खर्चून विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना हक्काची जाणीवदेखील असणे आवश्‍यक आहे.

विमान उड्डाणाच्या वेळेपूर्वी म्हणजेच घरगुती सेवेसाठी दोन तास तर परदेशासाठी तीन तास अगोदर विमानतळावर बोर्डिंग पाससाठी हजर असताना एखाद्या विमान कंपनीने बोर्डिंग पास नाकारला तर त्याविरुद्ध दाद मागू शकतो. परंतु प्रवाशाकडे अधिकृत कागदपत्रे नसतील किंवा दिलेल्या वेळेनंतर प्रवेशद्वारावर प्रवासी आलेला असाल तर अशा स्थितीत एअरलासन्स कंपनी संबंधित प्रवाशाचा प्रवेश नाकारू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रवाशाला किरकोळ कारणावरून बोर्डिंग पास नाकारला असेल किंवा विमान हुकले असेल आणि अशा स्थितीत विमान कंपनीने एका तासाच्या आत अन्य विमानात सोय करून दिली तर संबंधित प्रवाशाला नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार राहात नाही.

जर प्रवाशाच्या विमानाला नियोजित वेळेपेक्षा वीस तास उशीर झाला असेल तर विमान कंपनीने प्रवाशाला जेवण देणे किंवा ब्रेकफास्ट देणे बंधनकारक आहे किंवा संबंधित प्रवासी मागणी करण्यास पात्र आहे.

जर विमानाला वीस तासापेक्षा अधिक उशीर होत असेल तर प्रवाशाच्या राहण्याची व्यवस्था विमान कंपनीने करणे बंधनकारक आहे. त्यानुसार विमानतळावरून संबंधित प्रवाशाला नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी विमान कंपन्याची राहील.

प्रवाशाच्या अधिकृत फोन क्रमांकावर विमानाच्या वेळापत्रकाची, बदलाची माहिती वेळोवेळी देणे आवश्‍यक आहे. यासाठी विमान कंपनीला प्रवाशाने आपला फोन नंबर देणे अनिवार्य आहे.

– श्रीकांत देवळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)