‘या तो दोस्ती गहरी है, या ये फोटो थ्री डी है…'(प्रभात open house)

‘या तो दोस्ती गहरी है, या ये फोटो थ्री डी है…’ दिल चाहता है या फिल्म मधला हा डायलॉग खरंच खूप काही सांगून जातो. कारण आजही या फिल्म मध्ये आमिर,अक्षय आणि सैफ यांची अगदी ‘गहरी दोस्ती’ दाखविली आहे, ती सगळ्यांच्याच चांगलीच लक्षात राहिलीये. तर हा डायलॉग आत्ता आठवायचं कारण म्हणजे येत्या रविवारी म्हणजे 5 ऑगस्टला असणारा फ्रेंडशिप डे… 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदाच्या  फ्रेंडशिप डे निमित्ताने दैनिक प्रभात तुम्हाला संधी देतंय…  तुमच्या मैत्रीविषयी अगदी बिनधास्तपणे व्यक्त व्हा. मग तुमच्या खास मित्र-मैत्रिणींसोबत असलेली मैत्री असू शकते, एखाद्या जागेशी झालेली मैत्री असू शकते, एखाद्या वास्तूशी,संस्थेशी झालेली मैत्री असू शकते. 

एकूणच या फ्रेंडशिप डे ला तुम्ही तुमच्या आयुष्यातील मैत्रीबद्दल अगदी मुक्तपणे व्यक्त होऊ शकता. त्यासाठी एवढंच करायचंय…  तुम्ही तुमच्या मैत्रीविषयीचा छोटेखानी लेख आमच्याकडे पाठवा. त्यामध्ये तुमचे छायाचित्र पाठवायला विसरू नका.  येत्या रविवारच्या प्रभात open house… मध्ये निवडक प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्यात येईल. तुम्ही तुमचा लेख 200 ते 250 शब्दांमध्ये लिहून रविवार 5 ऑगस्ट पर्यंत आमचा मेल आयडी prabhatonlinenews@gmail.com पाठवू शकता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)