फ्रेंच बॅंकेत जाळपोळ प्रकरणी रशियन कलाकाराला तुरुंगवास

पॅरिस (फ्रान्स): एका फ्रेंच बॅंकेत जाळपोळ प्रकरणी अज्ञातवासात असलेला रशियन कलाकार प्योत्र पॅलेवेस्की याला न्यायालयाने गुरुवारी एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. त्याचा साथीदार ओक्‍साना शाल्यिजिना याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यापैकी सोळा महिन्यांची शिक्षा निलंबित आहे. प्योत्र पॅलेवेस्की याला एका वर्षाच्या शिक्षेबरोबरच दोन वर्षांचा निलंबित तुरुंगवास आणि 21,678 युरो (25,000 डॉलर्स) दंड करण्यात आला आहे. मात्र दंड भरण्यास त्याने नकार दिला आहे.

सन 2017 मध्ये प्योत्र पॅलेवेस्की याला फ्रान्समध्ये राजकीय आश्रय देण्यात आला होता. त्याने रशियात असताना ओठ शिवून घेणे, काटेरी तारांमध्ये विवस्त्र झोपणे अनेक चमत्कारिक पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला होता. एकदा तर त्याने निषेध म्हणून मॉस्कोमधील लाल चौकातील रस्त्यावर आपल्या वृषणाला खिळा ठोकला होता. आपल्या त्या निषेधाला त्याने फिक्‍सेशन असे नाव दिले होते. सन 2017 मध्ये तो फ्रान्समध्ये पळून आला होता आणि फ्रान्स सरकारने त्याला राजकीय आश्रय दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑक्‍टोबर 2017 मध्ये बॅंक डि फ्रान्सच्या दरवाज्यावर त्याने आग लावली होती, आणि त्यासाठी त्याला एक वर्षाची शिक्षा मिळाली आहे. मात्र 11 महिने त्याने तुरुंगात काढल्यामुळे त्याची लगेच सुटका करण्यात आलेली आहे. रशियात परत गेल्यास त्याला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)