फ्रेंच ओपन टेनिस : भारताच्या सुमित नागलचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात 

पॅरिस – भारताचा गुणवान उदयोन्मुख टेनिसपटू सुमित नागलने पहिला सेट जिंकल्यावरही पराभव पत्करल्यामुळे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीतील त्याचे आव्हान संपुष्टात आले. मात्र रामकुमार रामनाथन आणि प्रजनेश गुणेश्‍वरन या दोन भारतीय खेळाडूंना अजूनही मुख्य फेरीत स्थान मिळविण्याची संधी आहे. तर अव्वल भारतीय खेळाडू युकी भांब्रीने विश्‍वक्रमवारीत अव्वल 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले असल्याने त्याला थेट मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे.

दरम्यान 12व्या मानांकित रामकुमार रामनाथनसमोर पात्रता फेरीतील अखेरच्या लढतीत इंग्लंडच्या जे क्‍लार्कचे आव्हान आहे. तर प्रजनेश गुणेश्‍वरनला मुख्य स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी इटलीच्या साल्व्हातोर कारुसोशी झुंज द्यावी लागेल. गुणेश्‍वरनने नुकतीच चीनमधील कनमिंग ओपन चॅलेंजर स्पर्धा जिंकून अव्वल 200 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते.
सुमित नागलने स्लोव्हाकियाच्या 10व्या मानांकित मार्टिन क्‍लिझानविरुद्ध पहिला सेट जिंकताना खळबळ उडविली होती. परंतु त्याला या संधीचा फायदा गेता आला नाही. क्‍लिझानने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना पुढचे दोन्ही सेट जिंकून 4-6, 6-4, 6-1 अशी विजयासह आगेकूच केली. ही लढत सुमारे दोन तास रंगली. क्‍लिझानने नुकत्याच पार पडलेल्या बार्सिलोना ओपन स्पर्धेत नोव्हाक जोकोविच आणि फेलिसियानो लोपेझ या मानांकित खेळाडूंना पराभूत करताना सनसनाटी निकालाची नोंद केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)