फ्री इन्कमिंग कॉल्स बंद केल्याने ग्राहक संतप्त

लूट होत असल्याचा आरोप

किरण देशमुख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खटाव  – मोबाईल कंपन्यांनी ठराविक रक्कम देवून लाईफ टाईम इनकमिंग कार्ड दिलेल्या ग्राहकांना आता पुन्हा रिचार्ज करण्याबाबत मेसज येत असून रिचार्ज न केल्यास कार्ड बंद करण्याचा इशारा दिला जाता आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली असून लाईफ टाईम इनकमिंक स्कीमपोटी भरलेले पैसे परत द्यावेत, अन्यथा कार्ड जुन्या स्कीमद्वारे सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामीण भागातील ग्राहकांतून व्यक्त होत आहे.

सध्या सर्वत्र मोबाईल मधील बॅलन्सच्या नावाखाली रिचार्ज कंपन्या सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व लूट करत करत असल्याचा सूर ग्राहकांमधून उमटत आहे. सुरवातीच्या काळात लोकांना ‘फ्री’ ची सवय लावून कंपन्यांनी ग्राहक जमवले. लोकांना “नेट’चे व्यसन लावले व आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर कंपन्यांनी आपले रंग दाखवण्यास सुरवात केली. बी.एस. एन. एल. वगळता सर्व कंपन्यांनी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता इनकमींग, आऊटगोईंग सेवा बंद केली.

सीमकार्डवर कमीत कमी 35 शिल्लक हवी आहे व त्याची वैधता ही केवळ 28दिवस असेल. सुरूवातीला 10 पासून बॅल्नस मिळत असे. आता एकदम 35 रुपये व त्यातील ग्राहकांना मिळाणारी रक्कम फक्त 26 तीही फक्त 28 दिवस. त्यानंतर तुमच्या खात्यावर कितीही रक्कम असू द्या फोन लागनार नाही, अशा प्रकारची सेवा देण्यात येत आहे. सुरुवातीला सिमकार्ड खरेदी करत असताना लाईफ टाईम ईनकमींक फ्री म्हणूनच लोकांनी खरेदी केली मग अचानक ही सेवा बंद का केली? असेही ग्राहकांमधून बोलले जात आहे. कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)