फ्रिजच्या शॉर्ट सर्किटमुळे फ्लॅटला आग

आंबेगाव बुद्रुक – सर्व्हे क्रमांक 15-16 आंबेगाव पठारावरील श्री गणेश अपार्टमेंटमधील बी-विंग, चौथा मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 10मध्ये फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हा फ्लॅट सतीश घुले यांचा मालकीचा असून फ्लॅटमध्ये मूळचे हांगर गाव जिल्हा लातूरचे हंसराज सूर्यवंशी हे वर्षभरापासून भाड्याने कुटुंबासोबत राहत असून आहेत. सकाळी ते नोकरीसाठी बाहेर पडले तसेच त्यांची पत्नी मुलाला घेवून खाली गेली होती. सकाळी 9 वाजता सूर्यवंशी यांचा भाचा शुभम कल्याणी घरात असताना फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व जीवनावश्‍यक वस्तू जळून खाक झाल्या. यामध्ये किचन ट्रॉली, फ्रीज व किचनमधील सर्व साहित्य, बेडरूम वा हॉल मधील बरेचसे साहित्य जळाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले. त्यांनी आग आटोक्‍यात आणली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)