नवी दिल्ली : भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. मात्र, या स्पर्धेत भारत अद्यापही अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनच्या पिछाडीवरच आहे. सन 2018-19 वर्षासाठी भारताचा जीडीपी 7.3% राहिल, असा अंदाज आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले आहेत. विकासाच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला सातव्या स्थानावर ढकलत एक पाऊल पुढे टाकले आहे. गतवर्षी भारताचा जीडीपी 2.597 ट्रिलियन डॉलर होता, तर फ्रान्सचा जीडीपी 2.582 ट्रिलियन डॉलर एवढा होता. मात्र, जुलै 2017 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे. सध्या भारताची लोकसंख्या 1.34 अब्ज एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)