फ्रान्समध्ये मस्तवाल चालकामुळे दहशतवादी हल्ल्याचा आभास

वार्सेस अलिएरेस – मस्तवाल चालकाने सैनिकांच्या गटावर कार धडकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे दहशतवादी हल्ल्याचा आभास निर्माण झाला. फ्रान्सच्या नैऋत्येकडील भागात ही घटना घडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्याच आठवड्यात इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये 6 जण मरण पावले होते. त्याची आठवण ताजी असतानाच आज झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास फ्रेंच आणि अरेबिक भाषा बोलणाऱ्या एका व्यक्तीने वार्सेस अलिएरेस एट रिस्सेट येथे काही सैनिकांना धमकावले. नंतर त्याने धावण्याच्या सराव करणाऱ्या दुसऱ्या सैनिकांच्या गटावर कार धडकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र सैनिकांनी चपळाई करून स्वतःला वाचवले, असे लष्करी प्रवक्‍त्याने सांगितले. या घटनेनंतर कारचालक पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र त्याला जवळच्या ग्रेनोब्ल येथे अटक करण्यात आले. ही घटना म्हणजे दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्टिकरण नंतर लष्कराच्यावतीने देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या व्यक्‍तीकडे बनावट लायसेन्स होते. तसेच त्याच्यावर शस्त्र आणि अमली पदार्थांच्या कायद्याखाली गुन्हेही दाखल आहेत. तो कट्टरवाद्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्यावर पूर्वीपासून बारिक लक्षही ठेवले गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)