फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला – हल्लेखोरांचा इसिसशी संबधाचा दावा

संग्रहित छायाचित्र

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सच्या एका सुपर मार्केटमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला असून अनेक लोकांना बंधक बनवले असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण फ्रान्समधील ट्रेब्ज येथील एका सुपर यू नावाच्या एका सुपर मार्केटमध्ये सकाळी 11.15 सुमारास एक दहशतवादी गोळीबार करत घुसला. त्यानंतरही बराच वेळ गोळीबाराचे आवाज आल्याचे आणि सुपरमार्केटमध्ये घुसत असताना दहशतवाद्याने अल्ला हू अकबर अशा आरोळ्या दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने सुपरमार्केटमधील दहशतवादी हल्ल्याच्या बातमीची पुष्टी केली असून त्याविरुद्ध पोलीस आणि सुरक्षादलाची कारवाई चालू असल्याचे सांगितले आहे. दहशतवाद्याने आपला इसिसशी संबंध असल्याचे सांगितले आहे.

या हल्ल्यात किमान दोन जण मरण पावले आहेत. फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी गोळीबार आणि बंधक प्रकरणावरून हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

कारकासोन भागात एका दहशतवाद्याने 4 पोलीसांवर हल्ला केल्याची माहितीही पोलीसांनी दिली आहे, या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)