फ्रान्समधील ट्रिबेस येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली

ट्रिबेस : फ्रान्समधील ट्रिबेस येथील सुपरमार्केटवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात तीन  जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. दरम्यान हा  दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली असून, रेडवान लेकदिम असे त्याचे नाव आहे. हल्ला करण्यापूर्वी २५ वर्षीय रेडवानने त्याच्या लहान बहिणीला शाळेत सोडले होते, अशी माहिती समोर आली आहे.

या दहशतवादी हल्ल्यादरम्यान पोलिसांनी रेडवानला ठार केलं होतं. मात्र अद्याप त्याची ओळख पटवू  शकली नव्हती. सुपरमार्केटवर हल्ला करण्यापूर्वी रेडवानने कार्कसोन येथे एका कारचालकावर गोळीबार केला. त्याच कारने तो ट्रिबेसच्या दिशेने गेला. या दरम्यान त्याने एका पोलिसावरही गोळीबार केला. ट्रिबेसमध्ये त्याने सुपरमार्केटवर हल्ला केला. तिथे त्याने अनेकांना ओलीस ठेवले. शेवटी एका  पोलिसाने आत प्रवेश करत त्याला ठार केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)