फ्रान्सचे माजी अध्यक्ष सारकोझी पोलिसांच्या ताब्यात

2007 च्या निवडणूक प्रचारात लिबीयातून अर्थसहाय्य

पॅरिस – फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना पोलिसांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. फ्रान्समध्ये 2007 साली झालेल्या निवडणूकीच्या प्रचारामध्ये सारकोझी यांनी लिबीयातून अर्थसहाय्य मिळवल्याचा संशय आहे, असे या चौकशीशी संबंधित असलेल्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले. सारकोझी यांना आतापर्यंत या प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी त्या समन्सना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

लिबीयातील एका नेत्याने रोख रक्कम भरलेल्या तीन सुटकेस सारकोझी यांना निवडणूक खर्चासाठी पाठवल्या होत्या. या सुटकेस आपणच सारकोझी यांना दिल्या होत्या, असे एका उद्योजकाने गेल्या नोव्हेंबरमध्ये कबूल केले होते. सारकोझी यांचे सहकारी अलेक्‍झांड्री जौहरी यांच्याविरोधात फ्रान्स सरकारने दोन वेळेस वॉरंट बजावले होते. त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र लगेच त्यांची जामिनावर सुटकाही झाली. प्राथमिक चौकशीनंतर जोहरी फ्रान्समध्ये परतले आहेत.

त्यानंतर काही आठवड्यातच सारकोझी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे काही वृत्तवाहिन्या आणि फ्रान्समधील शोधपत्रकारिता करणाऱ्या दैनिकाने सर्वप्रथम उघड केले. सारकोझी यांच्या अध्यक्षीय काळातील वरिष्ठ मंत्री ब्रिस होर्त्फियर यांचीही आज याच प्रकरणी चौकशी करण्यात आली. सारकोझी यांनी आपल्याविरोधातील सर्व आरोप फेटाळले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)