फ्रांसच्या जवानांनी मालीत 30 गनिमांना घातले कंठस्नान 

बमाको: माली देशाच्या मध्यप्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या बंडखोरांवर तेथील फ्रांसच्या जवानांनी मोठी कारवाई केली. त्यात 30 गनिमांना कंठस्नान घालण्यात त्यांना यश आले. हे सर्व जण इस्लामिक कटरपंथीय संघटनेचे गनिम होते. ठार झालेल्यांमध्ये मुख्य जिहादी नेता हमादौन कौफा याचाही समावेश असल्याचा कयास आहे.

तो कतिबत मसिना या दहशतवादी संघटनेशी संबंधीत होता ही संघटना अलकायदाशी संलग्न असलेली दहशतवादी संघटना आहे. या गनिमांवर हवाई तसेच जमीनीच्या मार्गानेही कारवाई करण्यात आली. या भागात मित्र राष्ट्रांची मोठी लष्करी यंत्रणा तेैनात असून फ्रांसचे तेथे सर्वाधिक 3 हजार लष्करी जवान कार्यरत आहेत. या आधीच्या एका लष्करी कारवाईत गौरमा भागातील एक जिहादी नेताही गारद झाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)