फौजदाराला नेले फरफरटत

पिंपरी – रॉंग साईडने येणाऱ्या टेम्पो चालकाला थांबवून कारवाईसाठी त्याला वाहतूक शाखेच्या कार्यालयात घेऊन जाणाऱ्या सहायक फौजदाराला टेम्पो चालकाने भर रस्त्यावरुन फरफटत नेले. यात फौजदाराच्या छातीसह दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडगाव – घेनंद चौकात घडली.

श्रीकृष्णा जनार्दन म्हेत्रे असे जखमी झालेल्या आळंदी-दिघी वाहतूक शाखेतील सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी टेम्पो चालक किसन हरीभाऊ दौंडकर (वय-35, रा. संगमवाडी, काळुस) याला अटक केली आहे.

सहायक फौजदार श्रीकृष्णा म्हेत्रे यांची आळंदी-दिघी वाहतूक शाखेत नेमणूक आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते वडगाव-घेनंद चौकात वाहतूक नियमन करत होते. यावेळी विरुध्द दिशेने येणारा टेम्पो (एमएच 14, ईएम 7726) त्यांनी थांबवला. टेम्पो किसन दौंडकर चालवत होते. कारवाई करण्यासाठी श्रीकृष्णा यांनी टेम्पो वाहतूक कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले आणि ते स्वत: टेम्पोत बसू लागले. याचवेळी किसन याने टेम्पो पळवला. यामुळे श्रीकृष्णा रस्त्यावरून काही अंतर फरफटत गेले. यात त्यांच्या छातीला आणि दोन्ही हातांना जखमा झाल्या. आळंदी पोलीस याचा तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)