फोर्ब्सच्या श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानी 

नवी दिल्ली: फोर्ब्स मॅगझिनने श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानी इंडियाज 100 रिचेस्ट लिस्टमध्ये मुकेश अंबानींनी लागोपाठ 11 व्या वेळेस पहिले स्थान पटकावले आहे.
मुकेश अंबानी यांच्याकडे 4730 कोटी डॉलर(3.40 लाख कोटी)ची संपत्ती आहे. तसेच विप्रोचे अध्यक्ष अजिम प्रेमजी या यादीत दुस-या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2100 कोटी डॉलर(1.51लाख कोटी रुपये) आहे. आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल हे 1830 कोटी डॉलर(1.31 लाख कोटी रुपये)सह तिस-या क्रमांकावर आहेत. चौथ्या स्थानी हिंदुजा ब्रदर्सना संधी मिळाली आहे. अशोक, गोपीचंद, प्रकाश आणि श्रीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती 1800 कोटी डॉलर(1.29 लाख कोटी रुपये) आहे. बांधकाम व्यावसायात दबदबा असलेल्या शापूरजी पालोनजीचे मालक पालोनजी मिस्त्री या यादीत पाचव्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1570 कोटी डॉलर(11.3 लाख कोटी रुपये) आहे.
नादर, गोदरेज आणि सांघवी यांचीही वर्णी 
देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर 1460 कोटी डॉलर (10.5 लाख कोटी रुपये)च्या संपत्तीसह सहाव्या स्थानी आहेत. तर सातवं स्थान गोदरेज समूहाला देण्यात आलं आहे. त्यांची एकूण संपत्ती 1400 कोटी डॉलर(10 लाख कोटी रुपये) आहे. सन फार्माचे मालक दिलीप सांघवी या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1260 कोटी डॉलर(90,735 कोटी रुपये) आहे. इंडियाज 100 रिचेस्ट लिस्टमध्ये नवव्या स्थानी कुमार मंगलम बिर्ला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1250 कोटी डॉलर(जवळपास 90000 कोटी रुपये)च्या जवळपास आहे. यादीत दहाव्या स्थानी गौतम अडानी आहेत, त्यांनी एकूण संपत्ती 1190 कोटी डॉलर(85,682 कोटी रुपये) आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)