फोर्ब्सच्या ‘अंडर 30’ च्या लीस्टमध्ये अनुष्का

बॉलिवूडमध्ये जर कोणी गॉडफादर नसेल, तर टिकाव लागणे खूप मुश्‍कील असते. हे जरी खरे असले तरी जर टॅलेंट असेल तर कोणत्याही गॉडफादरची आवश्‍यकता भासता कामा नये. टॅलेंट असलेल्या कलाकारांना कोणत्याही शिफारससीशिवाय यश मिळवता येऊ शकते, हे अनुष्का शर्माने स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. स्वतः मॉडेलिंगमधून करिअरला सुरूवात करणाऱ्या अनुष्काने शाहरुख खानबरोबर फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. शाहरुखच्या बरोबर तिच्या कामाचेही भरपूर कौतुक झाले होते. एकापाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या चढत अनुष्काने आपली स्वतःची वेगळी क्रिएटिव्ह ओळख निर्माण केली आहे. तिच्या या यशाच्या चढत्या आलेखाची दखल आता फोर्ब्सनेही घेतली आहे. फोर्ब्सच्या अंडर 30 च्या 30 जणांच्या यादीमध्ये अनुष्काचा समावेश झाला आहे.

“अंडर 30′ च्या यादीमध्ये अनुष्का थेट 30 व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये वयाच्या तिशीच्या आतील आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्‍तींचा समावेश करण्यात येतो. विशेषतः उद्योग आणि आशियाच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्‍तींची यासाठी निवड होत असते.
अनुष्का जरी ऍक्‍ट्रेस म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थिरावली असली, तरी तिने गेल्या काही वर्षांमध्ये प्रोड्युसर म्हणूनही आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. तिने “एन एच 10′, “फिलौरी’ आणि “परी’सारख्या सिनेमांची निर्मितीही केली आहे. तिच्या “परी’ला बॉक्‍स ऑफिसवर विशेष यश मिळाले नसले, तरी बॉलिवूडमधील चांगल्या हॉररपटांमध्ये त्या सिनेमाची नक्कीच गणना केली जाऊ शकते. यातील अनुष्काच्या लुकची सर्वाधिक चर्चा झाली होती. आता तर “परी’चा तमिळ रिमेकही बनवण्याचे ठरते आहे. अनुष्काची निर्मिती असलेल्या “एन एच 10’चाही तमिळ रिमेक बनतो आहे. त्यामध्ये तमिळ ऍक्‍ट्रेस तृषा लीड रोल साकारते आहे. सध्या अनुष्का “सुई धागा’या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

भारतीय सिनेमाच्या वाढीसाठी अनुष्काचा प्रयत्न निश्‍चितच स्तुत्य आहे. त्यामुळे फोर्ब्सच्या “अंडर 30′ च्या यादीमध्ये तिचा समावेश होणे, ही काही आश्‍चर्याची बाब नाही. कारण आपले वेगळेपण तिने सिद्ध करून दाखवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)