फोन सुरक्षित ठेवणारा… फेशिअल अनलॉक फीचर 

किरण दीक्षित 

श्रीमंत असो वा गरिब प्रत्येकाकडे मोबाईल दिसतोच. भारतातील मोबाईलचा वापर वाढला आहे. दिवसागणिक स्वस्तच होत जाणारे व सहज उपलब्ध होणारे इंटरनेट,मोबाईल डाटा आणि एकुणच हे छोटेसे उपकरण आता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनत चालले आहे. विशेषतः गेल्या दोन वर्षांत स्मार्टफोन आणि ‘फोर जी’ने मोबाईल क्रांती झाली. दरम्यान, स्मार्टफोन आणि त्यामुळे मिळालेली कनेक्‍टिव्हिटी येऊनपाच वर्षे होऊन गेली. आज बाजारात नवनवीन स्मार्टफोन उपलब्ध झाली आहेत. बाजारात सध्या nokia, xiomi आणि apple सारख्या कंपन्यांनी आपले नवीन व्हर्जन बाजारात आणले आहेत. या सर्वच फोनमध्ये नवनवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. खास करून फेशिअल अनलॉक फीचर हा ऑप्शन देण्यात आला आहे. या ऑप्शनमुळे तुम्हाला तुमचा फोन आणि फोनमधील माहिती पूर्णपणे गुप्त ठेण्यासाठी मदत तर होणारच आहे. त्याशिवाय तुमचा चेहरा ओळखल्याशिवाय मोबाईल कोणतीही ऑप्शन ओपन करणार नाही…त्यामुळे हा ऑप्शन अनेक ग्राहकांना आकर्षित करणार हे मात्र नक्की…या स्मार्टफोन्सच्या भाऊगर्दीत कोण-कोणत्या कंपन्यांनी हा ऑप्शन आपल्या मोबाईल दिला आहे आणि त्यासोबत आणखी काय-काय सुविधा दिल्या आहेत चला तर पाहूयात…. 

यावर्षाच्या सुरुवातीलाच A83 लॉंच केल्यानंतर ओप्पोने आता या फोनचे अपग्रेडेड व्हर्जन लॉंच केले आहे. A83 या फोनची किंमत 13 हजार 990 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु, A83 प्रोची भारतातली किंमत 15 हजार 990 रुपये असण्याची शक्‍यता आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन पहिल्या व्हर्जनप्रमाणेच असतील, म्हणजे 5.7 इंच आकाराची स्क्रीन, 2.5GHz मीडियाटेक प्रोसेसर, 4GB रॅम, 64 GB स्टोरेज, 13 मेगापिक्‍सेल रिअर, 8 मेगापिक्‍सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मात्र अपग्रेडेड व्हर्जन, रॅम आणि स्टोरेज हे वेगळं नक्कीच असणार आहे. A83 प्रोमध्ये A83 च्या तुलनेत रॅम जास्त आहे. A83 प्रोमध्ये 3 GB ऐवजी 4GB रॅम, तर 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये ‘फेशिअल अनलॉक फीचर’ देण्यात आले आहे. जे वनप्लस 5T आणि आयफोन X मध्ये देण्यात आलेलं आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने बहुप्रतीक्षित Mi Mix 2s स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आधीच्या स्मार्टफोनसारखाच लूक या नव्या स्मार्टफोनलाही देण्यात आला असून, फीचर्समध्ये मात्र बदल करण्यात आले आहेत. अनेक आकर्षक फीचर्स या नव्या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले असून, तीन व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या तीनही फोनची किंमत स्पेसिफिकेशननुसार म्हणजे 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असेल आणि 34 हजार 200 रुपये किंमत असणार आहे. तर दुसऱ्या फोनची किंमत 37 हजार 300 रुपये आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या फोनला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले असून किंमत 41 हजार 400 रुपये आहे. 8 जीबी व्हेरिएंटच्या स्मार्टफोनसोबत एक हजार रुपयांचा वायरलेस चार्जरसुद्धा मोफत दिला जाणार आहे. एमआय मिक्‍स 2 एस स्मार्टफोनचा फ्रंट लूक याआधीच्या ‘एमआय मिक्‍स 2’ या स्मार्टफोन सारखा आहे.

फीचर्समध्ये मात्र काही बदल करण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी 2x झूमसोबत रिअर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. दोन्ही कॅमेरे 12-12 मेगापिक्‍सेलचे असून, 18:9 च्या आस्पेक्‍ट रेशोसह 8.99 इंचाचा पूर्णपणे एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्‍सेलचा स्नॅपर देण्यात आला असून, फोन सिक्‍युरिटीसाठी मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याचसोबत फेसलॉकची सुविधाही देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
30 :thumbsup:
16 :heart:
9 :joy:
6 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)