फोन चार्जरमधून तरुणींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या घरमालकाला अटक 

मुंबई: अनके विधार्थी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी  इतर दुसऱ्या शहरांमध्ये जातात. त्यानंतर हॉटेलमध्ये, हॉस्टेलवर किंवा पेईंग गेस्ट म्हणून एखाद्याच्या घरात राहतात. तर त्यासाठी सावधान ! कारण कोणीही तुमचे खाजगी क्षण किंवा फोटो चोरून पाहत असण्याची शक्यता आहे. त्यासाठी फॅन रेग्युलेटर, टेबल क्लॉक, किंवा  मोबाईल चार्जरसारखे न दिसणारे अशे छुपे कॅमेरांचा वापर करत आहे. मुंबईतल्या घरात भाड्याने राहणाऱ्या तरुणींचे खासगी क्षण रेकॉर्ड करणाऱ्या एका विकृत घरमालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे जवळपास दीड वर्षांपासूनचे व्हिडीओ सापडले आहेत.

दक्षिण मुंबई भागात राहत असलेल्या ४७ वर्षीय आरोपीला पोलिसांनी याच गुन्ह्याअंतर्गत अटक केली आहे. त्याच्या घरी गेल्या काही काळापासून तीन तरुणी भाड्याने राहतात होत्या. काही काळापासून आरोपी तरुणींच्या संभाषणातील वाक्यं अगदी जशीच्या तशी म्हणून दाखवायला लागला. आधी तरुणींना वाटलं की कदाचित संभाषणाचा आवाज मोठा असल्याने त्याच्यापर्यंत आवाज ऐकू जात असावा. मात्र, त्यातील एका तरुणीला घरात एक इलेक्ट्रिक अडाप्टर लावलेला दिसला. त्यामुळे तिला संशय आला. तिने त्यावर एक कपडा टाकून त्याला झाकून टाकलं. त्यानंतर लगेचच घरमालकाने घरात येऊन अडाप्टर झाकण्याविषयी विचारणा केली. अडाप्टर आपल्या घरातील टीव्हीचा बुस्टर असल्याचं सांगत त्याने तो न झाकण्याविषयी सूचना केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे त्या तरुणींचा संशय बळावला. त्यांनी त्या अडाप्टरचा फोटो काढून इंटरनेटवर शोधलं असता असे समोर आले कि , तो अडाप्टर नसून छुपा कॅमेरा आहे. त्यांनी ताबडतोब पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि त्वरित आरोपीला अटक केली. अडाप्टरमधील छुपा कॅमेराही पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यात सुमारे दीड वर्षांपूर्वीची फुटेज सापडली आहेत. त्यामुळे आरोपीने यापूर्वी तिथे राहणाऱ्या भाडोत्रींचे व्हिडीओ बनवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)