फोन कंपन्यांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मुंबई -कृत्रिम बुद्धिमत्तेचा विविध क्षेत्रांतील वापर वाढत आहे. आता ओप्पो या कंपनीने आपल्या नव्या एफ 7 मोबाइल फोनमध्ये या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे इतर कंपन्याही या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्‍यता आहे.
ओप्पोचे ब्रॅड व्यवस्थापक विल यांग यांनी सांगितले की, आमचा फोन सेल्फीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे फोटो काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे फोटोचा दर्जा वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

भारतातील परिस्थितीचा अभ्यास करून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे तरुणांना आमचा फोन आवडत असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, भारतातील लोकांना मोठ्या आकाराचे फोन आवडतात. त्यामुळे या फोनचा आकार तर मोठा आहेच त्याचबरोबर स्क्रीनचा पूर्ण वापर करण्यात आला आहे. भारतात आता फोर जी फोनचा वापर करणाऱ्याची संख्या वाढत आहे.

त्यामुळे इंटरनेट आधारित सर्व सेवांचा लाभ ग्राहकांना होईल याची काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे फोनचा दर्जा वाढला आहे. फोटो काढताना महिला आणि पुरुषांना ओळखून त्यानुसार फोटो काढण्याची सुविधा या फोनमध्ये असणार आहे. यात काही बायोमेट्रीक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.
ते म्हणाले की, भारतातील मोबाइलची बाजारपेठ वेगाने वाढणार आहे. त्यामुळे कंपनी आगामी काळातही संशोधन आणि विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, इतर कंपन्यांच्या संशोधन आणि विकास विभागातही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयावर काम चालू आहे. त्यामुळे इतर फोनमध्येही अशी वैशिष्ट्य दिसण्याची शक्‍यता आहे. या कारणामुळे आगामी काळातील मोबाइल हे ग्राहकांना अधिक गरजा दर्जेदार पद्धतीने पूर्ण करू शकणार आहेत. मोबाइलद्वारा इतर उपकरणांवर नियंत्रणाची शक्‍यता आता वाढू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)